Shruti Vilas Kadam
रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येण्याचा त्रास होऊ शकतो.
उपाशीपोटी चहा घेतल्याने काही लोकांमध्ये अपचन, पोट फुगणे किंवा मळमळ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
चहामधील टॅनिन्समुळे पोटावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
चहातील टॅनिन्स अन्नातील लोहाचे शोषण कमी करू शकतात. त्यामुळे विशेषतः एनिमियाचा धोका वाढू शकतो.
रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्यामुळे काहींना भिती, अस्वस्थता, हातपाय थरथरणे किंवा चिडचिड जाणवू शकते.
सकाळी पुरेसे पाणी न पिता फक्त चहा घेतल्यास शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते.
उठल्यानंतर प्रथम एक-दोन ग्लास पाणी प्या. त्यानंतर हलका नाश्ता किंवा फळ खाऊन चहा घ्या. अॅसिडिटी किंवा पोटाच्या समस्या असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.