Sialorrhea : झोपेत तोंडातून लाळ का येते? शरीर देतंय 'या' ७ गंभीर समस्यांचे संकेत

Shreya Maskar

झोपेत तोंडातून लाळ येते

झोपेत लाळ तोंडातून येणे याकडे आपण सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करतो. वैद्यकीय भाषेत याला सियालोरिया (Sialorrhea) म्हणतात. हे लहान मुलांमध्ये सामान्य आहे, परंतु प्रौढांमध्ये जर ते अचानक वाढले, तर ते शरीरातील बदलाचे लक्षण असू शकते.

Saliva | pinterest

कारणे काय?

अति प्रमाणात लाळ येण्याची मुख्य कारणे गिळण्यास अडचण येणे किंवा तोंडातील स्नायूंवर नियंत्रण नसणे ही असतात. इतर महत्त्वाची कारणे जाणून घेऊयात.

reasons | pinterest

मेंदू- मज्जातंतूंचे विकार

पार्किन्सन्स, स्ट्रोक, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, मल्टीपल स्क्लेरोसिस यांसारख्या मज्जासंस्थेच्या आजारांमध्ये तोंडातून लाळ गळते.

Brain | pinterest

संसर्ग-आजार

घशाचा संसर्ग, सायनसचा संसर्ग, टॉन्सिलिटिस, ॲलर्जी, दीर्घकाळचा ॲसिड रिफ्लक्स किंवा गरोदरपणात मळमळ यामुळे ही स्थिती उद्भवू शकते.

Infection | pinterest

फक्त रात्री झोपतानाच लाळ का गळते?

जेव्हा तुम्ही पाठीवर सरळ झोपता, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे लाळ तुमच्या तोंडातच राहते. तथापि, जर तुम्ही कुशीवर किंवा पोटावर झोपलात, तर लाळ सहजपणे बाहेर वाहते. जर तुम्ही नेहमीच कुशीवर झोपत असाल आणि ही समस्या अलीकडेच सुरू झाली असेल, तर हे ॲलर्जी किंवा ॲसिड रिफ्लक्सचे लक्षण असू शकते.

saliva | pinterest

दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम काय?

जास्त लाळ गळल्यामुळे तोंडाच्या कोपऱ्यातील त्वचेला भेगा पडू शकतात आणि वेदनादायक फोड येऊ शकतात. सर्वात मोठा धोका तेव्हा असतो जेव्हा ही अतिरिक्त लाळ श्वसनमार्गाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करते, ज्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो.

consequences | pinterest

उपाय काय?

तुमच्या आहारात आंबट आणि गोड पदार्थांचे प्रमाण कमी करू शकतात. लाळ कमी करणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

solution | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : सकाळी उठताच दुधाचा चहा पिताय? सावधान! सवय पडेल महागात, ५ गंभीर दुष्परिणाम एकदा वाचा

Milk Tea | AI PHOTO
येथे क्लिक करा...