ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेला कॉमेडी क्वीन म्हणून ओळखले जाते.
श्रेया बुगडे सध्या ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
श्रेयाने नुकतेच सोशल मीडियावर मेहंदी रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
श्रेया बुगडेने मेहंदी रंगाची साडी नेसून त्यावर मोत्याचे दागिने घातले आहेत.
श्रेयाने हिरवा चुडा, केसात बिंदी घालून फोटोशूट केले आहेत.
श्रेया बुगडे या मराठमोळ्या साजश्रृगांरात खूप सुंदर दिसत आहे.
श्रेया याआधी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.