Manasvi Choudhary
आज रामनवमी सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीचा सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे.
भारतातील लाखो भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत.
तब्बल ५०० वर्षानंतर पहिल्यांदाच अयोध्येत रामाच्या जन्मभूमीवर रामनवमी साजरी होत आहे.
यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे रामलल्लाच्या मस्तकी सूर्यतिलक अर्थात सूर्य किरणांचा अभिषेक होत आहे.
अयोध्येतील राममंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत राम जन्मोत्सव साजरा होतोय.
विशेष म्हणजे रामनवमीनिमित्त संपूर्ण राम मंदिराला फुलांची सजावट केली आहे. जी भाविकांच्या डोळ्यांचे पारणं फेडत आहे.