Manasvi Choudhary
श्रावणात घरात उपवासाचे सात्विक पदार्थ बनवले जातात. बटाटा खिचडी, बटाट्याची टिक्की, चाट आणि पुरी तुम्ही खाल्लीच असेल पण तुम्ही कधी बटाट्याचे लाडू ही रेसिपी खाल्ली आहे का?
बटाट्याचे लाडू बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकता.
बटाट्याचे लाडू बनवण्यासाठी बटाटे, शेंगदाणे पावडर, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ, लाल मिरची, जिरे हे साहित्य एकत्र करा.
बटाट्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वातआधी बटाटे कुकरमध्ये चांगले उकडून घ्या.
नंतर एका प्लेटमध्ये उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. या मिश्रणात शेंगदाणा पावडर, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ, जिरा पावडर घालून मिश्रण एकजीव करा.
तयार मिश्रणाचे गोळे बनवा. मिश्रण जास्त मऊ वाटत असेल तर तुम्ही त्यात शेंगदाण्याची पावडर मिक्स करू शकता.
गॅसवर तव्यावर थोडे तूप मिक्स करा त्यानंतर त्यावर लाडू सर्व बाजूंनी सोनेरी रंग होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्या.
बटाट्याचा हेल्दी लाडू तुम्ही न भाजता देखील सर्व्ह करू शकता. अशाप्रकारे घरच्या घरी बटाट्याच्या लाडूंची ही रेसिपी ट्राय करू शकता.