ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भिजलेले काळे चणे, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, ब्रेडक्रंब्स, आमचूर पावडर, लाल तिखट, धणे पावडर, मीठ आणि जीरे.
भिजलेल्या काळ्या चण्यांमध्ये चवीनुसार मीठ, हळद घाला आणि एका कुकरमध्ये शिजवून घ्या.
शिजलेल्या चण्यांमधले पाणी काढून टाका. काही चणे मॅशरने मॅश करून घ्या.
काळ्या चण्यांमध्ये मॅश केलेले बटाटे, चवीनुसार मसाले आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.
एका पॅनमध्ये थोड्या गरम तेलात जीरं, बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि आल्याची फोडणी तयार करा. कांदे पारदर्शक होईपर्यंत फोडणी परतून घ्या.
तयार झालेली फोडणी चणे आणि बटाट्याच्या मिश्रणात घाला. त्यात ब्रेडक्रंब्स घालून सर्व एकजीव करून घ्या. कबाबासाठीचे मिश्रण तयार करा.
हातांना तेल लावा. कबाबच्या मिश्रणाचा एक एक गोळा घेऊन त्याला तुम्हाला आवडेल तो आकार द्या.
एका फ्राईंग पॅनमध्ये मिश्रणाचे गोळे गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत शॅलो फ्राय करा. तयार झालेले काळा चणा कबाब टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसह गरमागरम सर्व्ह करा.