Manasvi Choudhary
श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात सात्विक आहाराेचे सेवन केले जाते.
श्रावणात कांदा- लसूण न वापरून पदार्थ बनवले जातात. अनेकांचा असा समज आहे की, पदार्थांमध्ये कांदा- लसूण वापरले नाही तर भाजीला चांगली चव येत नाही.
मात्र आज आम्ही तुम्हाला 5 रेसिपी सांगणार आहोत ज्या तुम्ही कांदा- लसूण न वापरता घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
कांदा- लसूण न घालता तुम्ही या भाजीमध्ये काजूची पेस्ट, टोमॅटो, आले आणि मसाला हे साहित्य वापरा.
वरील मसाले मिक्स करून तुम्ही मटार पनीर रेसिपी ट्राय करू शकता.
यात तुम्ही कसुरी मेथी आणि दुधावरची मलाई घातल्यामुळे या भाजीला चव भारी लागते.
दही जिरा आलू बनवण्याची रेसिपी सोपी
उकडलेले बटाटे, फ्रेश दही, जिरे, हिरव्या मिरच्या आणि मसाला हे साहित्य वापरा
भाजी बनवताना दही मिक्स केल्यास भाजीला आंबट- गोड चव येते.
मटकीची उसळ बनवण्यासाठी हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची याची फोडणी द्या.
मटकीची उसळ यात कांदा-लसणाची पेस्ट मिक्स करू नका तरीही चव भारी लागते.
शेंगदाण्याचा कूट, तीळ, खोबरे, गोडा मसाला, धने-जिरे पूड आणि गूळ-चिंचेचा कोळ एकत्र करून वाग्यांची भाजी बनवा.
टोमॅटोचा रस्सा भाजी बनवण्यासाठी तुम्ही गावठी टोमॅटो बारीक चिरून, त्यात शेंगदाण्याचा कूट आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी देऊन टोमॅटोची रस्सा भाजी बनवा.