ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण सुरू झाला की, अनेकजण श्रद्धा म्हणून उपवास करत असतात. यावेळी उपवास सोडताना पहिला घास भाताचाच का घेतला जातो? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
यामागे जशी धार्मिक कारणं किंवा मान्यता आहेत त्याचप्रमाणे काही वैज्ञानिक कारणंही आहेत.
सनातन धर्मात भाताला देवी अन्नपूर्णा आणि देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे उपवास सोडताना भात खाऊन उपवास सोडला तर लक्ष्मीची कृपा लाभते असे म्हटले जाते.
शिवाय देवाला प्रथम भाताचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून उपवास करणाऱ्या व्यक्तीनेही उपवासाचा शेवट भात खाऊनच करावा अशी धार्मिक मान्यता आहे.
पण यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, उपवासात दिवसभरात आपण जास्त काही खाल्लेले नसते. यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते.
अशावेळी उपवास सोडताना जड अन्नपदार्थ खाल्ले तर, पचनसंस्थेवर ताण पडू शकतो आणि पोटाचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे उपवास सोडताना प्रथम भात खाल्ला जातो.
काहीजण उपवास सोडताना दही भात खातात. उपवास शक्यतो रात्रीच्या जेवणाने सोडला जातो. रात्री दही खाऊ नये असे म्हटले जाते.
दह्याला तुप आणि जीऱ्याची फोडणी दिल्यास ते पित्तावर सर्वोत्तम औषध ठरते. यामुळे रात्रीच्या वेळीस देखील दह्याचे सेवन केल्यास ते बाधत नाही आणि अपचन,जळजळ होत नाही.
दिवसभराच्या उपवासानंतर दही भात हा एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये असलेले उपयुक्त बॅक्टेरिया अन्न पचनासाठी सहाय्यक ठरतात.