Satish Daud
येत्या 5 ऑगस्टपासून हिंदू धर्माचा पवित्रा असा श्रावण महिना सुरू होत आहे.
त्यामुळे श्रावणात काय खावे आणि काय नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो.
श्रावणात अर्ध्याहून अधिक दिवस उपासाचे असतात. त्यामुळे काही पथ्यं पाळावे लागतात.
शास्त्रानुसार श्रावणात आहाराबाबत काही पथ्यं सांगितली आहेत. याचं पालन अनेकजण करतात.
श्रावणात पाऊस पडत असल्याने बहुतांश वेळा पचनक्रिया मंदावते. अशावेळी जड पदार्थ खाणे टाळावे.
म्हणूनच या काळात कोणत्याही प्रकारच्या डाळीचे सेवन टाळले, तर ते आरोग्यास फायदेशीर ठरते.
अनेकजण श्रावणात वांगी खात नाही. कारण वांग्याकडे वाताळ पदार्थ म्हणून पाहिलं जातं.
श्रावणात पचनशक्ती कमकुवत होत असल्याने कांद्याचे तसेच इतर तामसी आहाराचं सेवन करू नये.
कांद्याबरोबरच श्रावणात लसूण आणि हिरव्या पालेभाज्यांचेही सेवण करणे टाळल्यास आरोग्य चांगले राहते.