Shraddha Kapoor Photo : अप्सरा आली...; नऊवारी साडीत श्रद्धा कपूरचा मराठमोळा थाट! गजरा अन् नथीच्या नखरा पाहून चाहते घायाळ

Shreya Maskar

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा आगामी 'ईठा' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून महाराष्ट्राच्या तमाशा आणि लावणी क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे.

Shraddha Kapoor | instagram

श्रद्धा कपूरची भूमिका

चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. श्रद्धाचा पारंपरिक लावणी कलाकाराचा लूक, नऊवारी साडी, नथ, गजरा आणि ठसकेबाज नृत्यशैली विशेष लक्ष वेधून घेत आहे.

Shraddha Kapoor's role | instagram

'ईठा'चा ट्रेलर

'ईठा'च्या ट्रेलर लाँचसाठी श्रद्धा कपूरने खास मराठमोळा लूक केला होता. जांभळ्या रंगाच्या सुंदर साडीत श्रद्धा कपूरचा पारंपरिक आणि आकर्षक लूक पाहायला मिळाला. श्रद्धा कपूरने सुंदर साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Eetha Trailer | instagram

श्रद्धाचा लूक

श्रद्धाने जांभळ्या रंगाची सुंदर पारंपरिक साडी नेसली आहे. साडीवर छोटे आकर्षक डिझाइन्स असून गुलाबी आणि सोनेरी रंगाची नक्षीदार बॉर्डर आहे. साडीला मॅचिंग असा गडद गुलाबी रंगाचा हाफ स्लीव्ह्ज ब्लाउज तिने परिधान केला आहे. ब्लाउजवरील सोनेरी नक्षीकाम लूकला अधिक उठावदार बनवत आहे.

Shraddha look | instagram

पारंपरिक साज

नाकात नथ, कानात सुंदर पारंपरिक कानातले, गळ्यात नाजूक नेकलेस आणि हातात हिरव्या-जांभळ्या रंगांच्या बांगड्या असा तिचा दागिन्यांचा साज आहे.

traditional decor | instagram

मराठमोळा लूक

श्रद्धाने तिने केस मागे बांधून साधी आणि एलिगंट हेअरस्टाइल केली आहे. कपाळावर छोटी टिकली, हलका मेकअप आणि चेहऱ्यावरील सुंदर हास्य तिच्या लूकमध्ये भर घालत आहे. गोल्डन रंगाच्या आकर्षक एम्बेलिश्ड हिल्समुळे तिच्या पारंपरिक लूकला मॉडर्न टच मिळाला आहे.

Marathmola look | instagram

चित्रपटातील कलाकार

‘ईठा’ चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, सिद्धार्थ जाधव, मोहम्मद झीशान अय्युब, नाना पाटेकर, उल्का गुप्ता हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Actors in the film | instagram

‘ईठा’ कधी प्रदर्शित होणार?

‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा हिंदी भाषेतील बायोग्राफिकल ड्रामा आणि म्युझिकल चित्रपट आहे.

Etha' be released | instagram

NEXT : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Gautami Patil | SAAM TV
येथे क्लिक करा...