Shruti Kadam
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करते.
श्रद्धा कपूरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्रीने अलीकडेच एका लग्नाला हजेरी लावली होती सुंदर तपकिरी रंगाच्या एथनिक पोशाख श्रद्धा कपूरने परिधान केला होता.
या लग्नातील फोटो बघून श्राद्धाला लोकप्रिय स्ट्रीट फूड पाणीपुरी खायला खूप आवडते हे तिच्या चाहत्यांना समजल.
श्रद्धाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, पाणीपुरी प्रेमींनो, मी मोजायला विसरले, मग मला आठवले की लग्नांमध्ये पाणीपुरी अनलिमिटेड असते.
श्रद्धा शेवटची राजकुमार रावसोबत 'स्त्री २' मध्ये दिसली होती. अलीकडेच, स्त्री फ्रँचायझीच्या निर्मात्यांनी या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.
श्रद्धाचा अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री ३ हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होईल.