Saam Tv
महिला या केसांची काळजी घेण्यामध्ये कधीच काही कमी सोडत नाही.
काही महिला आठवड्यातून दोनदा केस धुतात. तर काहीजणी रोज केस धुतात.
केस धुताना महिला विविध शॅम्पूचा वापर करतात. पण हे केसांसाठी योग्य आहे की नाही हे आपण पुढे जाणून घेऊ.
तुम्ही रोज शॅम्पूने केस धुतलेत तर, तुमच्या केसातील कोंडा, तेलकटपणा, चिकटपणा निघून जातो.
तसेच तुमच्या केसात असलेले सेबम तुमच्या केसात कोंडा वाढवण्याचे काम करतात.
जर तुम्ही रोज शॅम्पूने केस धुतलेत तर सेबमचा सर्वनाश होतो. त्यासोबत केस फ्रेश आणि टवटवीत दिसतात.
जर तुमचं स्कॅल्प तेलकट राहत असेल तर तुम्ही दिवसाआड शॅम्पूने केस धुवू शकता.
जर तुमचे केस ड्राय असतील तर तुम्ही आठवड्यातून १ ते २ वेळा केस स्वच्छ करू शकता.
नॉर्मल पातळ केस असल्यास तुम्ही आठवड्यातून २ वेळा केस धुणे योग्य ठरेल.