Saam Tv
केसांच्या समस्या महिलांना सगळ्याच ऋतूत सहन कराव्या लागतात.
महिलांनी त्यांच्या केसांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या सवयी बदलायला हव्यात.
पुढे आपण केसांची काळजी घेताना नकळत कोणत्या चुका करतो. याबद्दल जाणून घेणार आहोत.
काही महिलांना असा प्रश्न पडतो की, झोपताना केस बांधावे की मोकळे सोडावे.
महिलांच्या या प्रश्नाचं उत्तर दोन प्रकारे सांगता येईल.
पहिलं म्हणजे केस मोकळे सोडून झोपल्याने बल्ड सर्कुलेशन चांगलं होतं.
तसेच केस मुळापासून मजबूत बनतात. तर याचं नुकसान सुद्धा आहे.
बऱ्याचदा तुम्ही केस मोकळे करून झोपता तेव्हा केसात गुंता होतो. आणि केस तुटतात.
तुम्ही अशा वेळेस केसांचा आकार लहान असेल तर मोकळे ठेवू शकता किंवा लांब असले तर सैलसर वेणी बांधून झोपू शकता.