Manasvi Choudhary
घरातून बाहेर जाण्यापूर्वी फ्रिजचे बटण बंद करावे की नाही? असा प्रश्न सर्वंच महिलांना पडतो.
फ्रिज बंद केल्याने विजेची बचत होते असे वाटत असेल असे वाटते तर ते चुकीचे आहे. प्रवासाला जाण्यापूर्वी फ्रिज बंद करावा की नाही? हे जाणून घ्या.
जर तुम्ही फक्त २ ते ४ दिवसांसाठी बाहेर जाणार असाल तर फ्रिज बंद करू नका.
फ्रिज बंद केल्याने आतील तापमान वेगाने वाढते. वारंवार फ्रिज चालू- बंद केल्याने कॉम्प्रेसरवर ताण येतो.
जर तुम्ही ४ ते ५ दिवसांपेक्षा जास्त काळासाठी बाहेर जाणार असाल तर वीज वाचण्यासाठी फ्रिज बंद करू शकता.
फ्रिज बंद करण्यापूर्वी त्यातील दूध,दही, भाजीपाला तसेच इतर कोणतेही पदार्थ बाहेर काढा अन्यथा खराब होऊन दुर्गधी येऊ शकते. तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी फ्रिज संपूर्ण रिकामा करा आणि स्वच्छ पुसून बंद करा.
तुम्ही दीर्घकाळ बाहेर जाणार असाल तर फ्रिजचे 'व्हॅकेशन मोड' चालू करा, जे अन्न थंड ठेवते पण कमी वीज वापरते.