Dhanshri Shintre
दिवसाचे आरोग्यदायी सुरुवात करणाऱ्या सवयींपैकी एक महत्त्वाची सवय म्हणजे नियमित आंघोळ करणे होय.
काहीजण सकाळी उठताच आंघोळ करतात कारण त्यामुळे दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि उत्साहाने होते.
काही लोक संध्याकाळी झोपण्यापूर्वी आंघोळ करतात, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि झोपेचा दर्जा सुधारतो.
या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची बेडशीट, त्याचा आराम आणि स्वच्छतेवर मोठा परिणाम होतो.
आंघोळीची वेळ फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या बेडची स्वच्छता राखण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरते.
रात्री झोपताना त्वचेच्या मृत पेशी अंथरुणावर जमा होतात, ज्यामुळे लहान कीटक त्यांचा आहार बनवतात.
कीटकांच्या विष्ठेमुळे त्वचेला जळजळ, ऍलर्जी आणि दमा सारखे त्रास होऊ शकतात, त्यामुळे स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.
आपली प्राचीन वैद्यकशास्त्र प्रणाली सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी आंघोळ करण्यास सर्वोत्तम मानते.
उन्हाळ्यात किंवा जास्त घाम येणाऱ्या ऋतूमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आंघोळ केल्यास उत्तम.