Saam Tv
झोपताना केस मोकळे ठेवल्यास टाळूला हवा मिळते. त्यामुळे घाम, ओलावा साचत नाही. केस सैल राहिल्याने तुटण्याचा धोका नसतो.
झोपेत हालचालीमुळे केस उशीवर घासले जातात. त्यामुळे उठल्यावर केस गुंतणे, जटा होणे, तुटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
केस बांधून झोपल्याने तुटण्याची समस्या नसते.गुंता होत नसतो. केस मऊ राहतात. त्यामुळे सकाळी केस विंचरण्यात जास्त वेळही जात नाही.
केस बांधून झोपल्याने त्यांच्यावर ताण येतो. यामुळे केस गळू शकतात. घट्टपणामुळे आवश्यक असलेले तेल टाळू पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे केस निस्तेज आणि कोरडे होतात. याशिवाय हेअरलाईन मागे देखील जाऊ शकते.
केस जर बांधल्याशिवाय झोप येत नसेल त कापडी रिबीन किंवा सॉफ्ट रबरांचा वापर करा.
सिल्क किंवा मऊ कॉटनचे उशीचे कव्हर वापरल्यास केसांचे घर्षण कमी होते. त्यामुळे केस गुंतणे, तुटणे कमी होते.
काय योग्य हे केसांच्या प्रकारावर आणि आवडीवर अवलंबून असते. केसांमध्ये गुंता असेल तर सैल केस बांधा.मोकळे केस ठेवणार असाल तर सॉफ्ट उशीचा वापर करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.