Dhanshri Shintre
महिलांना मासिक पाळीदरम्यान व्यायाम करावा की नाही, हा एक सामान्य आणि महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मनात असतो.
तुम्हालाही मासिक पाळीत व्यायाम करावा की नाही हा प्रश्न पडला असेल, तर पुढील स्लाईड्स वाचा.
आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की मासिक पाळीदरम्यान महिलांनी व्यायाम करणे सुरक्षित असून त्यावर कोणतीही बंदी नाही.
मासिक पाळी दरम्यान हार्मोनल बदलांमुळे महिलांना थकवा, चिडचिड आणि शारीरिक दुर्बलता जाणवण्याची शक्यता असते.
मासिक पाळीच्या वेळी व्यायाम केल्यास महिलांना वेदना कमी होण्यास आणि आराम मिळण्यास मदत होते.
व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते, ज्यामुळे महिलांना अधिक ऊर्जा मिळते आणि त्या ताजेतवाने व सक्रिय वाटतात.
आरोग्यतज्ज्ञ सुचवतात की मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी अधिक श्रम देणारा व्यायाम टाळावा, शरीराला विश्रांती द्यावी.
पाळीच्या काळात हलकी हालचाल, स्ट्रेचिंग, डान्स योग्य असतो; पण सायकलिंग, वेटलिफ्टिंग, तीव्र कार्डिओ टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.