Dhanshri Shintre
सध्याच्या काळात बदललेल्या खाण्याच्या सवयीमुळे अनेकांना पचनाच्या त्रासांचा सामना करावा लागत आहे.
चुकीच्या आहारामुळे अनेकांना पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या सामान्यपणे भेडसावत आहेत.
आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे गॅस, बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्यापासून दिलासा देतील.
सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिल्याने पचन सुधारते आणि पोट नैसर्गिकरित्या साफ होण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट स्वच्छ राहते.
फायबरयुक्त अंकुरित धान्य, फळे, सॅलड व संपूर्ण धान्य आहारात घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
उपाशीपोटी लिंबू आणि मध टाकून कोमट पाणी पिल्याने पोट स्वच्छ होण्यास आणि विषारी घटक बाहेर जाण्यास मदत होते.
आहारात कोणतीही नवीन गोष्ट समाविष्ट करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते.