Manasvi Choudhary
रात्री जेवण केल्यानंतर मस्त थंड आईस्क्रिम खायला सर्वांनाच आवडते. मात्र थंडीच्या दिवसात आईस्क्रिम खावे की नाही हे जाणून घेऊया.
थंडीत आईस्क्रिम खाऊ नका असे तुम्ही देखील घरातील मोठ्या मंडळीकडून ऐकलेच असेल. खरंच, थंडीत आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्यावर थेट परिणाम होतो.
आईस्क्रीम खूप थंड असल्यामुळे ते शरीराचे आतील तापमान कमी करते. थंडीच्या दिवसात शरीर नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्याचा प्रयत्न करत असते, अशावेळी थंड पदार्थ खाल्ल्यास शरीरावर परिणाम होतो.
थंडीच्या दिवसात आईस्क्रिम घसा दुखतो यामुळे देखील आईस्क्रिम खाणे टाळले पाहिजे. जास्त थंड खाल्ल्यास घशा तील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात यामुळे वेदना होऊ शकतात.
ज्यांना कफ होण्याचा त्रास आहे त्यांनी थंड पदार्थ खाणे टाळावे यामुळे त्रास अधिक वाढण्याची शक्यता आहे. अनेकदा थंड पदार्थ खाल्ल्याने दात देखील ठणकतात यामुळे दातदुखी वाढते.
थंडीत तुम्हाला जर आईस्क्रिम खायचे असेल तर तुम्ही रात्री न खाता ते दुपारच्या वेळेत खावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.