Manasvi Choudhary
उन्हाळ्यात काकडी आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. काकडीमध्ये ९९ टक्के पाणी असते यामुळे उन्हाळ्यात काकडीचे सेवन केले जाते.
काकडीमधील थंड गुणधर्म पोटातील उष्णता कमी करतात यामुळे उन्हाळ्यात काकडी खातात.
मात्र काकडी सोलून की सालीसकट खावी, असा प्रश्न अनेकांना पडतो यासाठी योग्य पद्धत जाणून घेऊया.
काकडीची साल कडू असल्याने अनेकजण साल काढून काकडीचे सेवन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का काकडीच्या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन के, अॅटीऑक्सिड्टंस पोषण तत्वे असतात जी शरीरासाठी फायदेशीर आहेत.
१) शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
२) पोटाच्या समस्या कमी होतात.
३) हाडांनी मजबुती देते.
४) शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
1)काकडीवरील धूळ, बॅक्टेरिया, जंतू यामुळे त्रास होऊ नये म्हणून काकडी सोलून खाल्ली जाते त्यावरील साल काढतात.
मात्र याशिवाय तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून काकडी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर राहील.