Surabhi Jayashree Jagdish
जेवल्यानंतर पाणी न पिणं ही सवय अनेकांना योग्य वाटते पण ती पूर्णपणे बरोबर नाही. शरीरातील पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. जेवल्यानंतर खूप वेळ पाणी न प्यायल्यास काही शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की जेवणानंतर पाणी प्यावं की नाही. जेवणानंतर जवळपास ३० मिनिटांनी तुम्ही पाणी प्यायलं पाहिजे. मात्र अर्ध्या तासानंतरही तुम्ही पाणी पित नसाल तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूयात.
जेवल्यानंतर पाणी न घेतल्यास अन्नाचं पचन नीट होत नाही. त्यामुळे पोटात जडपणा आणि अपचन जाणवू शकते. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास पचनसंस्था कमजोर होऊ शकते.
पाणी न प्यायल्यामुळे तुमच्या पोटातील आम्लाचं प्रमाण जास्त राहतं. त्यामुळे छातीत जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या वाढते. विशेषतः मसालेदार अन्नानंतर हे जास्त जाणवतं.
पाणी पोषक तत्व शरीरात पोहोचवण्यास मदत करतं. त्यामुळे तुम्ही जेवणानंतर पाणी न प्यायल्यास ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या अन्नातून मिळत असणारे फायदे कमी होऊ शकतात.
जेवणानंतर पाणी न घेतल्यास शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते. यामुळे थकवा आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. गरम हवामानात हे अधिक धोकादायक ठरू शकतं.
पाणी शरीराचं मेटाबॉलिझम योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असतं. पाणी कमी प्यायल्याने घेतल्यास मेटाबॉलिक प्रक्रिया मंदावते. यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.