Saam Tv
भारतीयांचे आवडते पेय म्हणजेच चहा आहे. ते दिवसातून किमान ३ ते ४ वेळा चहा घेतात.
चहा बनवण्याची पद्धत किंवा रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असते.
tea
चहा करताना काही चूका झाल्या की चहा ची चव बिघडते आणि शरीरावर सुद्धा वाईट परिणाम होतो.
तुम्हाला जर टपरीसारखा फक्कड चहा करायचा असेल तर साखरेचा वापर कसा आणि कधी करायचा हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
चला आपण रेसिपी जाणून घेऊयात. त्यासाठी चहा पूड, वेलची, पाणी, आलं दूध घ्या.
चहाचे पातेल घ्या आणि चालू गॅसवर ठेवा. त्यात अर्धा कप पाणी आणि ४ चमचे साखर घाला. ती विरघळल्यावर २ कप पाणी घाला.
आता चहा पूड २ चमचे घालून चमच्याने मिक्स करा. पुढे ठेचलेलं आलं घाला आणि उकळी काढून घ्या.
आता त्यात १ कप थंड दूध घालून पुन्हा उकळा. चला तयार आहे तुमचा फक्कड चहा.
अशा पद्धतीने चहा केल्याने चहाची चव आणखी वाढते.