Running after 35: वयाच्या ३५ वर्षांनंतर महिलांनी वॉक करावं की रनिंग?

Surabhi Jayashree Jagdish

फिटनेसला प्राधान्य द्या

३५ वर्षांनंतर महिलांनी नियमित शारीरिक हालचाल करणं महत्त्वाचं आहे. सुरुवात करण्यासाठी दररोज वेगाने चालणं हा सोपा पर्याय आहे. प्रौढांनी आठवड्याला किमान १५० मिनिटं मध्यम तीव्रतेचा व्यायाम किंवा ७५ मिनिटं अधिक तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे.

walking after 35 | saam tv

रोज पायी चाला

चालणं हा कमी तीव्रतेपासून मध्यम तीव्रतेपर्यंत करता येणारा व्यायाम असून तो नियमितपणे करणं तुलनेने सोपं आहे. वेगाने चालल्यामुळे हृदयाची गती आणि श्वासोच्छ्वास वाढतो. वजन नियंत्रणासोबत हृदय, रक्तदाब, झोप आणि एकूण आरोग्यासाठी नियमित शारीरिक हालचाल फायदेशीर ठरते.

best exercise for women | saam tv

धावणं अधिक तीव्र व्यायाम

धावणं किंवा जॉगिंग हे वेगाने चालण्यापेक्षा तीव्र स्वरूपाचा एरोबिक व्यायाम आहे. त्यामुळे समान वेळेत चालण्याच्या तुलनेत साधारणपणे अधिक ऊर्जा खर्च होऊ शकते. मात्र किती कॅलरी खर्च होतील हे शरीराचे वजन, वेग आणि व्यायामाच्या कालावधीवर अवलंबून असते.

fitness tips for women | saam tv

३५ नंतर धावण्याचा हाडांनाही फायदा

वय वाढताना हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल महत्त्वाची असते. धावणं हा वजनाचा भार हाडांवर आणणारा अधिक तीव्र व्यायाम असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरू शकतो.

exercise for women over 35 | saam tv

चालणं सोडून थेट धावण्याकडे वळू नका

यापूर्वी नियमित व्यायामाची सवय नसेल तर अचानक धावण्याऐवजी आधी वेगाने चालण्यापासून सुरुवात करणं योग्य ठरते. शरीराला सवय झाल्यानंतर चालणं आणि हलकं जॉगिंग तुम्ही करू शकता. मध्यम व्यायामातून अधिक तीव्र व्यायामाकडे हळूहळू जाण्याचा सल्ला दिला जातो.

running benefits for women | saam tv

एकाची निवड करण्याची गरज नाही

३५ वर्षांनंतर महिला क्षमतेनुसार चालणं आणि धावणं यांचा फिटनेस रूटीनमध्ये समावेश करू शकतात. काही दिवस वेगाने चालणं आणि काही दिवस हलकं जॉगिंग असं नियोजन करता येतं. यासोबत आठवड्यातून किमान दोन दिवस स्नायू मजबूत करणारे व्यायाम केल्यास फिटनेस रूटीन अधिक संतुलित होते.

aerobic exercise for women | saam tv

फिटनेस पातळी

धावणं प्रत्येक महिलेसाठी आवश्यकच आहे असं नाही. व्यायामाची निवड तिची सध्याची फिटनेस पातळी, शरीराची क्षमता आणि आरोग्यस्थिती लक्षात घेऊन करावी. त्यामुळे ३५ नंतरचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे नियमित हालचाल, वेगाने चालणं, क्षमतेनुसार धावणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचं मिश्रण आहे.

heart health for women | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

running for bone health | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Digestion | saam tv
येथे क्लिक करा