Shraddha Thik
नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतील. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात आणि अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
बरेच लोक रोज नारळाचं पाणी पितात. काही लोक दिवसातून दोन वेळही नारळाचं पाणी पितात.
हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना नारळ पाणी पिण्याचा फायदा मिळतो. पण याचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच याचं सेवन केलं पाहिजे.
नारळ पाणी नियमितपणे प्यायला हवे कारण यात पोटॅशिअम भरपूर असते. यामुळे शरीराची पोटॅशिअमची गरज पूर्ण होते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले एक्स्ट्रा आयर्न आणि सोडिअम लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते.
तुम्ही नारळ पाण्याचं सेवन कमजोरी दूर करण्यासाठीही करू शकता. याने तुम्हाला लगेच एनर्जी मिळते. याने ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदतही मिळते.
किडनीच्या आजाराने पीडित लोकांनी याचं सेवन टाळलं पाहिजे. यात आढळणारं पोटॅशिअम किडनी फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे या किडनीच्या रूग्णांनी याचं सेवन टाळलं पाहिजे.