Curd Benefits: खरंच रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये?

Surabhi Jayashree Jagdish

दही

दही हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. म्हणूनच नेहमी दही खाण्याचा सल्ला देतात. दह्यापासून बनणाऱ्या लस्सीचाही जगभरातील लोक आनंद घेतात.

रात्रीचं दही खावं का?

अनेकांच्या मनात प्रश्न असतो की रात्री दही खाणं योग्य आहे का. विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्हींचे याबाबत वेगवेगळे मत आहे.त्यामुळे दही खाण्याची योग्य वेळ जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

प्रोबायोटिक्स

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात. हे चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसंच लिव्हर निरोगी ठेवण्यातही त्यांचा फायदा होतो.

कॅल्शियम आणि ट्रिप्टोफॅन

दह्यात कॅल्शियम आणि ट्रिप्टोफॅनसारखे घटक असतात. हे शरीर रिलॅक्स करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. यामुळे रात्री शांत आणि चांगली झोप लागू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती

रात्री दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होऊ शकते. उन्हाळ्यात अनेक लोक यासाठी दह्याचा आहारात समावेश करतात.

सर्दी किंवा खोकला

काही लोकांना रात्री दही खाल्ल्यानंतर सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो. विशेषतः ज्यांना हा त्रास लवकर होतो त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच दही खावं.

आयुर्वेद काय सांगतं?

आयुर्वेदानुसार रात्री दही खाणे प्रत्येकासाठी योग्य नसतं. ज्यांना कफ, सांधेदुखी किंवा सायनसचा त्रास आहे त्यांनी दही टाळावं. आरोग्यानुसार, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी दही खाणेच फायदेशीर ठरते.

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

येथे क्लिक करा