Manasvi Choudhary
हिरवा वटाणा ही अशी भाजी आहे जी वर्षभर खाल्ली जाते.मात्र ताजे मटार हे वर्षभर उपलब्ध नसतात अशावेळी फ्रोजन मटार खाल्ले जातात.
मात्र फ्रोजन मटार खावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी फ्रोजन मटारचे सेवन करावे की नाही हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
मटारमध्ये फायबर भरपूर असते, जे पचनासाठी चांगले असते. परंतु, फ्रोजन मटारला दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यात सोडियम किंवा इतर केमिकल्सचा वापर केला जातो यामुळे पचनसंस्था बिघडते. पोट फुगते.
फ्रोजन मटार ताजे ठेवण्यासाठी आणि त्यांची चव टिकवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात मीठ वापरले जाते. अतिप्रमाणात सोडियम वापरल्यने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
मटार गोठवण्याच्या प्रक्रियेत काही प्रमाणात त्यातील व्हिटॅमिन सी आणि इतर पाण्याचा अंश कमी होतो. ताजे मटार खाण्याने जेवढे 'अँटी-ऑक्सिडंट्स' आणि पौष्टिक घटक मिळतात, तेवढे फ्रोजन मटारमध्ये नसतात.
फ्रोजन मटारमध्ये साखरेचे प्रमाण किंवा पॅकिंग करताना जोडलेले घटक कॅलरीज वाढवू शकतात. जर तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर फ्रोजन मटारचा परिणाम होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.