Manasvi Choudhary
इडली हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. मात्र नेहमीची प्लेन इडली खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर नवीन रेसिपी ट्राय करा.
स्टफ इडली रोल तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता. अत्यंत सोपी रेसिपी आहे.
स्टफ इडली रोल बनवण्यासाठी इडली पीठ, उकडलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची, तेल, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद आणि मीठ हे साहित्य घ्या.
रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. त्यानंतर प्लेटमध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करा.
या मिश्रणात कांदा, मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद हे मिश्रण मिक्स करून त्याचे रोल करून घ्या.
एका स्टीलच्या ग्लासमध्ये इडली पीठ टाकून बटाट्याचा रोल उभा राहील असा ठेवून त्यात इडली पीठ मिक्स करा.
रोल बुडेल इतकं पीठ त्यामध्ये मिक्स करा. आता इडलीच्या भांड्यात एक ताटली ठेवा. त्यात इडलीचा हा ग्लास ठेवा आणि इडली वाफवून घ्या.
ही इडली शिजण्यासाठी प्लेन इडलीपेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे घाई करू नका.
इडली शिजली की ते सुरी किंवा चमच्याच्या सहाय्याने इडली रोल काढून घ्या नंतर गॅसवर तव्यायवर फोडणी द्या रोल फिरवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी स्टफ इडली रोल ही रेसिपी तयार होईल.