Manasvi Choudhary
विवाहित महिलांच्या सोळा श्रृगारांपैकी एक म्हणजे मंगळसूत्र. विवाहित महिल्यांच्या दागिन्यामध्ये मंगळसूत्राला विशेष महत्व आहे.
मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही ट्रेडिशनल टू मॉडर्न डिझाईन्स निवडू शकता.
छोटं मंगळसूत्रामध्ये मॉडर्न, क्लासी आणि मिनिमलिस्ट असे युनिक पॅटर्न्स असतात. हे पॅटर्न्, तुम्ही ऑफिस लूकसाठी, वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांवर घालू शकता.
तुम्हाला जर अस्सल पारंपारिक लूक करायचा असेल तर तुम्ही लांब मंगळसूत्र निवडू शकता. साडी, ड्रेस आणि लेहंगा यावर लांब मंगळसूत्र उठून दिसते.
काळ्या मोत्यांच्या सिंगल किंवा डबल चेनमध्ये डायमंडचे छोटे आणि आकर्षक लॉकेटमध्ये लटकन शॉर्ट मंगळसूत्र असते.
दोन वाट्या आणि मधे काळे-सोनेरी मोती असलेली असं पारंपारिक लांब मंगळसूत्र निवडू शकता.
दोन किंवा तीन लेयर्सचे मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहेत. लेयर्स मंगळसूत्र साडी, ड्रेसवर अधिक उठून दिसते.
लक्ष्मी किंवा गणपतीची छोटी डिझाईन असलेले टेम्पल लॉकेट आणि त्याला जोडलेले काळे मोती, असा ट्रेडिशनल लूक सध्या महिलांच्या पसंतीस उतरत आहे.
ज्यांना हेवी दागिने घालायला आवडत नाहीत, त्यांनी बारीक डिझाईनचे छोटे मंगळसूत्र निवडावे.