Manasvi Choudhary
फॅशनच्या दुनियेत हटके आणि स्टायलिश कपड्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच असते. सध्या शॉर्ट कुर्तीचा ट्रेंड सर्वत्र पाहायला मिळतो. अनेक मुली शॉर्ट कुर्ती आणि जिन्स अशी फॅशन करतात.
तुम्हाला देखील शॉर्ट कुर्ती खरेदी करायच्या असतील तर तुम्ही खालील ५ पॅटर्न नक्की ट्राय करा.
कॉलेज असो, ऑफिस असो शॉर्ट कुर्ती आणि जिन्स हा लूक कुल वाटतो. जीन्सवर शॉर्ट कुर्ती परिधान केल्याने स्टायलिश लूक मिळतो.
चिकनकारी कुर्ती कधीही ट्रेंडमध्ये असते. पेस्टल रंगांमधील चिकनकारी शॉर्ट कुर्ती आणि जीन्स क्लासिक दिसते.
जर तुम्हाला थोडा मॉडर्न आणि वेस्टर्न लुक हवा असेल, तर पेपलम कुर्ती पॅटर्न ट्राय करा. या कुर्ती फिटिंगमध्ये असतात. खाली कमरेभोवती घेर असतो.
ए-लाईन कुर्ती पॅटर्नमध्ये कुर्ती पुढच्या बाजूने थोडी शॉर्ट आणि मागच्या बाजूने लांब असते. हा कुर्तीचा पॅटर्न कॅज्युअल आणि कम्फर्टेबल दिसतो.
फ्रंट स्लिट शर्ट पॅटर्नमध्ये कुर्तीला पुढे छोटा कट असतो. हा शॉर्ट कुर्तीचा पॅटर्न तुम्ही ऑफिस वेअरसाठी ट्राय करू शकता.
पारंपारिक लूकला मॉडर्न लूक देण्यासाठी तुम्ही अनारकली शॉर्ट कुर्ती आणि जिन्स असा लूक करू शकता. हा लूक कम्फर्टेबल दिसतो.