तीच तीच हेअरस्टाईल नको! वटपौर्णिमेला साडीवर ट्राय करा 'या' 5 हटके हेअरस्टाईल्स

Manasvi Choudhary

पारंपारिक लूक

वटपौर्णिमा या सणाला महिला खास नटतात- सजतात. साडी नेसतात. साडी नेसल्यावर मराठमोळ्या पारंपारिक लूकवर अनेक महिलांना केसांची हेअरस्टाईल काय करावी हे सुचत नाही.

Vatpurnima Special Look | Social Media

केसांच्या हटके हेअरस्टाईल्स

नेहमीच मोकळे केस किंवा एक रबर लावण्याऐवजी तुम्ही केसांच्या ५ सुंदर हेअरस्टाईल्स करू शकता.

5 Unique Hairstyle

बन हेअरस्टाईल्स

काठपदर साडीवर तुम्ही बन हेअरस्टाईल करू शकता. त्यावर तुम्ही मोगऱ्याच्या फुलांचा गजरा किंवा गुलाबाचे फूल लावा.

Bun hairstyles

हेअर ब्रोच लावा

आजकाल बाजारात विविध हेअर ब्रोच मिळतात ते देखील तुम्ही केसांसाठी वापरू शकता यामुळे लूक उठून दिसतो.

Bun Hairstyle

ब्रेड हेअरस्टाईल

तुमचे केस जर मोठे असतील तर तुम्ही केसांची लांब सागर किंवा खजूर वेणी बांधा आणि त्यावर गजरा लावा.

Bread Hairstyles

क्लासिक स्लीक अंबाडा

क्लासिक स्लीक अंबाडा ही हेअरस्टाईल तुम्ही खास काठपदरी साड्यांवर करू शकता. या हेअरस्टाईल्समध्ये केस मधून किंवा बाजूने भांग पाडून घट्ट मागे बांधले जातात.

Classic Sleek Ambada

मेसी अंबाडा हेअरस्टाईल

नेट किंवा शिफॉन साडी नेसली असेल तर तुम्ही मेसी अंबाडा ही हेअरस्टाईल करू शकता. केस सैलसर मागे घेऊन मानेपाशी हा अंबाडा बांधा.

Messy Bun Hairstyle

NEXT: पावसाळ्यात साप घराजवळ येणार नाही! लाल मिरची पावडरचा 'हा' सोपा उपाय करून पाहा

येथे क्लिक करा..