Manasvi Choudhary
पावसाळा सुरू झाला की बिळातून साप बाहेर येतात आणि मानवी वस्तीत सरकताना दिसतात. पावसाळ्यात साप चावण्याच्या घटना अधिक घडतात.
पावसाळ्यात घराजवळ साप निघण्याची अनेकांना भिती असते अशावेळी सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय फायदेशीर आहे.
स्वयंपाकघरातील मसाल्याचा वापर तुम्ही सांपाना घरापासून दूर ठेवण्यासाठी करू शकता.
सापाची वास घेण्याची क्षमता तीव्र असते. लाल मिरचीचा उग्र वास आणि तिचा तिखटपणा सापांना सहन होत नाही.
लाल तिखट मिरची घराच्या मुख्य प्रवेशद्वार, खिडक्यांच्या कडा, बागेची भिंत किंवा जिथे कुठे अंधार असेल तेथे ठेवा. किंवा या सर्व ठिकाणी लाल मिरची पावडरची रेषा मारा.
पाण्यात लाल मिरची पावडर आणि थोडे लसूण पाणी एकत्र करून एक स्प्रे तयार करू शकता. हा स्प्रे घराच्या बाहेरील कोपऱ्यांमध्ये किंवा ओलसर जागी मारा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.