Shruti Vilas Kadam
केसांना हलका सीरम लावून मागे व्यवस्थित विंचरून घ्या. मानेला लागून छोटी पोनीटेल बांधा. ही हेअरस्टाईल साधी आणि ऑफिससाठी परफेक्ट दिसते.
डोक्याच्या पुढील भागातील थोडे केस घेऊन मागे क्लिप किंवा रबरबँडने बांधा. उरलेले केस मोकळे ठेवल्याने लूक अधिक स्टायलिश दिसतो.
लहान केस मागे एकत्र करून छोटासा बन तयार करा. बाहेर राहिलेले केस पिनच्या मदतीने सेट करा. पारंपरिक किंवा कॅज्युअल लूकसाठी ही स्टाईल छान दिसते.
केसांना एका बाजूने डीप साइड पार्टिंग करून घ्या. पुढचे केस हलक्या कर्ल्सने सेट केल्यास काही मिनिटांत ग्लॅमरस लूक तयार होतो.
लहान केस मागे घेऊन मोठ्या क्लॉ क्लिपने सुरक्षित करा. ही हेअरस्टाईल करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि कॅज्युअल आउटिंगसाठी उत्तम पर्याय आहे.
केसांवर हीट प्रोटेक्टंट लावून स्ट्रेटनर किंवा कर्लिंग टूलच्या मदतीने हलक्या वेव्ह्ज तयार करा. शेवटी बोटांनी केस थोडे सैल करा.
कपाळाजवळील केसांचा छोटा भाग घेऊन तो ट्विस्ट करून मागे पिन करा. दोन्ही बाजूंना अशीच स्टाईल केल्यास लहान केसांना सुंदर आणि फ्रेश लूक मिळतो.