Manasvi Choudhary
केस छोटे असले की ते कसे बांधायचे असा प्रश्न सर्वच महिलांना होतो यासाठी आज आम्ही तुम्हाला काही हेअरस्टाईल्स सांगणार आहोत.
छोट्या केसांमध्ये स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही खालील स्टाईल्स ट्राय करू शकता.त
केसांना दोन्ही बाजूंनी भांग पाडा. ज्या बाजूला केस जास्त आहेत, तिथली पुढची एक बट घेऊन ती पिळवटून कानामागच्या बाजूला पिन लावून ठेवा
ज्यांचे केस खाद्यांपर्यत आहेत त्यांनी हाफ केसांचा अंबाडा बांधून बाकी केस मोकळे सोडा ही स्टाईल थोडी मॉडर्न आहे.
कपाळाच्या एका बाजूने वेणी विणायला सुरुवात करा आणि प्रत्येक वेळी वरची एक बट सोडून खालची बट त्यात बांधत जा लग्नसमारंभात किंवा पार्टीत इंडो-वेस्टर्न स्टाईलवर उठून दिसेल.
छोट्या केसांचा मानेजवळ एक छोटा पोनीटेल बांधा साडी किंवा ड्रेसवर हा लूक भारी दिसेल.
सर्व केसांना थोडे जेल किंवा पाणी लावून मागे विंचरा. त्यावर एखादा स्टायलिश हेअर बँड किंवा मोत्यांची क्लिप लावा.