Manasvi Choudhary
रोज वापरण्यासाठी साडी निवडताना ती कम्फर्टेबल आणि स्टायलिश असणे महत्वाचे आहे.
दररोज नेसण्यासाठी साडी कधीही हलकी आणि सुटसुटीत , दिसायला नीटनेटकी असली पाहिजे.
शिफॉनच्या साड्या या हलक्या असतात प्रिटेंड साडी डिझाईन्स तुम्ही डेली वेअरसाठी निवडू शकता या साड्या नेसल्यावर सुंदर दिसतात.
लिनन साडी ही घाम शोषून घेते दिवसभर ही साडी घातली तरी गरम होत नाही, थकवा येत नाही. या साड्या पेस्टल कलरमध्ये असतात
घरामध्ये दिवसभर घालण्यासाठी तुम्ही हलक्या त्याचसोबत सॉफ्ट कापड असणाऱ्या साड्या निवडा मुल्मुल कॉटन या साड्या हलक्या असतात.
जॉर्जेटला सुरकुत्या पडत नाहीत, त्यामुळे ही साडी मेंटेन करायला सोपी आहे. लाल, पिवळा किंवा हिरवा अशा ब्राइट रंगातील बांधणी साड्या उठून दिसतात
साडी साधी असली तरी ब्लाऊजची डिझाईन थोडी स्टायलिश असावी म्हणजे लूक खुप सुंदर दिसतो.