ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करणे खूप महत्वाचे आहे.
मॉर्निंग वॉकमुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो, तसेच वजन कमी होण्यास मदत होते.
पण तुम्हाला माहीत आहे का, मॉर्निंग वॉकला जाताना बूट घालावेत की चप्पल, जाणून घ्या.
मॉर्निंग वॉकसाठी बूट घालणे हे चांगले मानले जाते. कारण, यामुळे पायांना आधार मिळतो आणि तुम्ही कम्फर्टेबल वॉक करु शकता.
धावताना किंवा चालताना झटका कमी लागण्यासाठी चांगला कुशन असलेला मिडसोल बूट वापरा.
चप्पल घालून मॉर्निंग वॉक केल्याने पायांना सपोर्ट आणि स्थिरता मिळत नाही.
चप्पल घालून मॉर्निंग वॉक केल्याने पायाला दुखापत होण्याचा धोका जास्त असतो.