Manasvi Choudhary
तुम्ही कधी एक किलो भाजी १२०० रूपयांना खरेदी केली आहे का?
तुम्हालाही हे ऐकून आश्चर्यच वाटलं असेल, मात्र हे खरं आहे.
भारतात हिरव्या पालकच्या भाजीची किंमत साधारण 40 ते 50 रूपये किलो आहे.
मात्र फ्रान्समध्ये हाच पालक 12-14 युरो म्हणजेच अंदाजे 1,200 रूपयाने विकला जात आहे.
हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. यामागे देखील अनेक कारणे आहे. ती माहित करूया.
फ्रान्समध्ये पालक महाग असण्यामागचे कारण म्हणजे युरोपीयन देशांमध्ये शेती पूर्णत:यांत्रिक पद्धतीने केली जाते. आणि जेथे शेती केली जाते तेथे शेतकऱ्याला मजुरांना तासाचे 1000 ते 1500 रूपये द्यावे लागतात याचा परिणाम भाजीच्या किंमतीवर होतो
कारण फ्रेंच सुपरमार्केटमध्ये विक्रीला असणाऱ्या भाज्या ह्या सेंद्रिय पद्धतीच्या असतात यामुळे मार्केटमध्ये भाजीपाला महाग विकला जातो.
फ्रान्समध्ये वर्षभर शेती करत नाही कारण थंड वातावरणात येथे शेती करणे अंत्यत कठिण असते.
त्यामुळे फ्रान्सच्या मार्केटमध्ये येणाऱ्या भाज्या ह्या परदेशातून आयात केलेल्या असतात त्यामुळे किंमतीवर परिणाम होतो.