Late Night Eating: संध्याकाळी ६.३० नंतर जेवल्यावर शरीरात होतात हे धक्कादायक बदल

Surabhi Jayashree Jagdish

रात्री उशीरा जेवणं

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना रात्री उशिरा रात्री जेवण्याची सवय आहे. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. सूर्यास्तानंतर शरीराची पचनशक्ती हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे उशिरा जेवण केल्यास अन्न पचायला वेळ लागतो आणि अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Dinner Timing | saam tv

पचनक्रिया मंदावते

संध्याकाळी ६.३० नंतर शरीराची पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. त्यामुळे उशिरा खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि पोटात जडपणा जाणवतो. यामुळे अपचन आणि अस्वस्थता वाढू शकते.

Digestive Problems | saam tv

पोट फुगणं

उशिरा जेवल्यामुळे अन्न पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो आणि पोट फुगल्यासारखं वाटतं. ही समस्या वारंवार झाल्यास दैनंदिन जीवनावर परिणाम होतो.

Weight Gain Causes | saam tv

वजन वाढणं

रात्री उशिरा खाल्लेलं अन्न शरीरात चरबी म्हणून साठवलं जातं. कारण त्या वेळी शरीराची ऊर्जा खर्च करण्याची प्रक्रिया मंद असते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.

Sleep Disorders | saam tv

झोपेवर परिणाम

उशिरा जेवल्यामुळे शरीर एक्टिव्ह राहतं आणि झोप लागायला उशीर होतो. काही लोकांना रात्री वारंवार जाग येण्याची समस्या येते. त्यामुळे झोपेची क्वालिटी कमी होते आणि थकवा वाढतो.

Healthy Eating Habits | saam tv

हार्ट अटॅकचा धोका वाढतो

उशिरा जेवण केल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहात नाही. यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या हृदयावरही अतिरिक्त ताण येतो.

Acidity Issues | saam tv

नैसर्गिक बायोरिदम बिघडतं

सूर्यास्तानंतर शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जातं. मात्र पण जेवल्यामुळे ही प्रक्रिया बिघडते आणि शरीराची नैसर्गिक लय बिघडते. याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो.

Night Eating Syndrome | saam tv

High cholesterol: नखांमध्ये हे ६ बदल दिसले तर समजा रक्तवाहिन्यांमध्ये साचतेय चरबी

Cholesterol warning signs | saam tv
येथे क्लिक करा