Shreya Maskar
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या जवळ शिवनेरी किल्ला वसलेला आहे. शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ डोंगरमाथ्यावर वसलेला आहे.
शिवनेरी किल्ल्याच्या मध्य भागात, गडमाथ्यावर बदामी तलाव वसलेला आहे. हा ऐतिहासिक आणि कृत्रिमरीत्या दगडी फरशी, भिंतींनी बांधलेला तलाव (टाकी) आहे.
बदामी तलाव हा शिवनेरी किल्ला परिसरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक जलरचनांपैकी एक मानला जातो. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात असलेला हा मोठ्या आकाराचा गोलाकार पाण्याचा तलाव पूर्वी किल्ल्यातील पाणीपुरवठ्यासाठी उपयोगी ठरत असे.
किल्ल्यावरील पावसाचे पाणी साठवून ते गरजेच्या काळात वापरण्याची व्यवस्था या जलरचनेतून दिसून येते. शिवनेरीच्या अंतर्गत भागात असल्याने किल्ल्यातील रहिवासी व सैनिकांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत होता.
डोंगरी किल्ल्यांमध्ये पाण्याची उपलब्धता ही संरक्षणाइतकीच महत्त्वाची होती. त्यामुळे अशा तलावांमुळे किल्ला दीर्घकाळ टिकवणे शक्य होत असे.
प्राचीन काळात शिवनेरी हा नाणेघाट आणि माळशेजघाट मार्गांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा दुर्ग होता. शिवनेरी किल्ल्याची रचना त्रिकोणी स्वरूपाची असून चारही बाजूंनी नैसर्गिक कडे आणि कठीण चढाव आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळात किल्ल्यावर हल्ला करणे तुलनेने कठीण होते.
शिवनेरी किल्ला मूळतः सातवाहन राजघराण्याने १ व्या शतकाच्या आसपास मोक्याचा लष्करी चौकी आणि व्यापार मार्ग संरक्षक म्हणून बांधला होता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.