ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र पाहिलं की त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ तुम्ही पाहिली असेल.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, शिवाजी महाराज ही माळ का घालायचे?
छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात नेहमी कवड्यांची माळ घालायचे, कारण ती त्यांच्या कुलदेवता तुळजाभवानी देवीचे प्रतीक होती.
तुळजाभवानी हे भोसले घराण्याचे कुलदैवत होते आणि शिवाजी महाराज तुळजाभवानीचे निष्ठावान भक्त होते.
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, कवड्याची माळ ही तुळजाभवानी देवीचे प्रतीक होती आणि भोसले घराण्यात ही माळ परिधान करण्याची परंपरा होती.
शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला स्वतःचं कुलदैवत मानलं आणि तिच्या श्रद्धेपोटी नेहमी कवड्याची माळ गळ्यात परिधान करत असत
छत्रपती शिवाजी महाराज गळ्यामध्ये नेहमी कवड्यांची माळ घालत असत याबद्दल कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.