Shivaji Maharaj Brother: इतिहासातील गूढ व्यक्तिमत्त्व; शिवाजी महारांजांचे बंधू संभाजी राजे भोसलेंच्या मृत्यूचं कारण काय?

Shruti Vilas Kadam

जन्म

संभाजीराजे यांचा जन्म १६२३ मध्ये झाला. शहाजीराजे आणि जिजाऊंच्या ६ पुत्रांपैकी ते तिसरे पुत्र होते.

Shivaji Maharaj history

बालपण

यासह संभाजीराजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. त्यांचे बालपण शहाजी राजांच्या बंगळूर (कर्नाटक) येथील वास्तव्यात गेले.

Shivaji Maharaj Brother Sambhaji Raje Bhosale

युद्धकौशल्य

 संभाजीराजे लहानपणापासूनच धाडसी होते. त्यांना वडिलांकडून युद्धनीती, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा आणि संस्कृतचे उत्तम शिक्षण मिळाले होते.

Shivaji Maharaj Brother Sambhaji Raje Bhosale | saam tv

कनकगिरीची लढाई

 कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत शहाजीराजे यांनी संभाजीराजे यांना पाठवले होते. येथे अफजल खानाने दगाफटका करून संभाजी राजांची हत्या केली.

Shivaji Maharaj Brother Sambhaji Raje Bhosale | Saam Tv

वीरमरण (१६५५)

१६५५ मध्ये कर्नाटकातील कनकगिरीच्या झालेल्या या लढाईत संभाजी राजांना वीरमरण आले.

Shivaji Maharaj Brother Sambhaji Raje Bhosale | Saam tv

पराक्रम आणि वारसा

 संभाजीराजे हे स्वराज्य स्थापनेच्या आधीच पराक्रम गाजवणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची समाधी कनकगिरी (कर्नाटक) येथे आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj

शिवाजी महाराजांवरील प्रभाव

 आपल्या थोरल्या भावाच्या (संभाजीराजे) हत्येचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी कनकगिरीवर मोहीम आखली होती आणि त्यानंतर अफजल खानाचा वध केला, असेही मानले जाते.

Chhatrapati Shivaji Maharaj

Avocado Benefits: सलग १४ दिवस दररोज एक ॲव्होकॅडो खाल्ला, तर शरीरात हे 7 फायदेशीर बदल

Avocado Benefits | yandex
येथे क्लिक करा