Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातला शिरोडा बीच हा महाराष्ट्रातील एक सुंदर, शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो, जो निसर्गरम्य आणि गर्दीपासून दूर असलेले ठिकाण आहे.
स्वच्छ वाळू, निळाशार समुद्र आणि नारळाच्या बागांचे नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळते. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
शिरोडा बीच जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. जिथे कायाकिंग, पॅरासेलिंग, जेट स्की आणि स्कुबा डायव्हिंग सारख्या अनेक रोमांचक जलक्रीडांचा आनंद घेता येतो.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शिरोडा बीचला आवर्जून भेट द्या. शिरोडा बीचवर सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
शिरोडा बीचला भेट दिल्यावर कोकणी संस्कृतीची खरी झलक दिसते, जिथे तुम्हाला मासळी बाजार, बाजारपेठ, नारळीच्या बागा, स्थानिक खाद्यपदार्थ, सीफूड पाहायला मिळेल. येथील सोलकढी जगप्रसिद्ध आहे.
तुम्ही येथे संध्याकाळी जोडीदारासोबत निवांत समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला येऊ शकता. लहान मुलं येथे वाळूत खेळताना दिसतात.
शिरोडा बीचजवळ यशवंतगड किल्ला, प्राचीन रेडी गणपती मंदिर, तेरेखोल किल्ला यांसारखी आकर्षणे आहेत. येथेही तुम्ही भेट देऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.