ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिल्पा शेट्टी ही इंडस्ट्रीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. जी तीच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे नेहमीच खूप चर्चेत असते.
विशेषतः शिल्पाचा साडीतील लूक हा खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस असतो, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पहायला मिळते.
नुकतेच शिल्पाने नवीन साडी लुक्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती परफेक्ट फॅशन गोल्स देताना दिसत आहे.
शिल्पाने लाल बॉर्डर डिझाइन केलेली साडी आणि हॉल्टर नेक ब्लाउज घातले आहे. जे खूप कूल लूक देत आहे.
शिल्पाची साडी जितकी सोबर आहे तितकीच ती स्टायलिश लुक देत आहे. ब्रॅलेट स्टाईल ब्लाउज तिच्या लूकमध्ये बोल्डनेसचा तडका देत आहे.
शिल्पाची ही साडी देखील अप्रतिम आहे आणि हेवी वर्क असलेला ब्लाउज देखील खूप सुंदर दिसतो आहे.
अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट असलेली ही साडी देखील खूप छान आहे. शिल्पाने त्यावर खूप छान स्टाईल केलीली दिसून येत आहे.
जर तुम्हाला तुमच्या नॉर्मल साडीच्या लूकमध्ये बोल्डनेसचा तडका जोडायचा असेल तर तुम्ही शिल्पाचे लूक नक्कीच फॉलो करू शकता.