Chetan Bodke
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
अभिनय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेत्री शिल्पा शेट्टीला 'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' या पुरस्काराने गौरविण्यात आले.
न्यायमूर्ती के जी बालकृष्णन आणि न्यायमूर्ती सुधा यांच्या हस्ते बॉलिवूड शिल्पा शेट्टीला पुरस्कार मिळाला.
या सोहळ्या दरम्यानचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, 'भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. तसंच मला माझ्या कामाचाही गर्व आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालं जे मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात.'
यावेळी अभिनेत्रीने स्पेशली मराठमोळी साडी परिधान करीत पुरस्कारसोहळ्याला हजेरी लावली होती.
शिल्पा शेट्टीने या सोहळ्यासाठी हिरव्या रंगाची एब्रॉयडरी साडी नेसली होती.
साध्या सिंपल लूकमध्ये शिल्पा खूपच सुंदर दिसत असून तिने नॉर्मल मेकअप केला आहे.
या फोटोंमध्ये शिल्पाचा साधा सिंपल लूक पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर ३ लाखांच्या आसपास लाईक्स असून चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून सौंदर्याचे कौतुक केले.