ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा, केसगळती सारख्या समस्या उद्भवतात.
परंतु, आयुर्वेदामध्ये असे अनेक वनस्पती आहेत ज्याचा वापर केल्यास तुमच्या केसगळतीची समस्या होईल दूर.
तुमच्या केसांना शैंपू ऐवजी शिकेकाई वापरा. शिकेकाई एक आयुर्वेदिक वनस्पती आहे ज्याच्या वापरामुळे केस गळत नाही.
शिकेकाईमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए,विटामिन सी,विटामिन के,विटामिन डी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात.
शिकेकाईचा वापर केल्यास केसांना नेसर्गिक चमक दिसून येते आणि केस वाढू लागतात.
शिकेकाई वापरल्यामुळे केसांमधील कोड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
शिकेकाई वापरल्यामुळे केसांना पोषन मिळते ज्यामुळे केसांची मुळे देखील मजबूत होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.