Manasvi Choudhary
पावसाळ्यात शेवळा भाजी खाल्ली जाते. शेवळा भाजी अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट भाजी आहे.
शेवळ्याच्या भाजीचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत आणि ती कोणी खावी किंवा कोणी खाऊ नये. हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
शेवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर चे प्रमाण असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
शेवळा भाजीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते वजन कमी होण्यास फायदा होतो.
शेवळा भाजी नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात, जी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि थकवा दूर करण्यास मदत करतात.
शेवळा ही भाजी रक्तातील साखेवर नियंत्रण ठेवते त्यामुळे डायबिटिजच्या रूग्णांनी या भाजीचे सेवन करणे फायदेशीर आहे.
निरोगी व्यक्तींनी शेवळ्याच्या भाजीचे सेवन करणे. तसेच ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अश्या व्यक्तींनी शेवळ्याची भाजी खावी.
१) ज्यांना अॅलर्जी, त्वचेवर खाज सुटण्याची समस्या आहे अशा व्यक्तींनी शेवळा भाजी खाऊ नये.
२) ज्यांना गॅस, ॲसिडिटी किंवा आतड्यांचे आजार आहेत, त्यांनी ही भाजी खाणे टाळावे.
३) गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी भाजी खाणे टाळावे.