Shreya Maskar
पावसाच्या दिवसात गरमा गरम पिठलं अन् भाकरी खाण्याची मज्जाच वेगळी असते.
महाराष्ट्राच्या अनेक भागात पिठलं बनवण्याची पद्धत वेगळवेगळी आहे.
तुम्ही कधी शेवग्याच्या शेंगांचं पिठलं खाल्ल आहे का?
पिठलं बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा, बेसन, तेल, हिंग, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, लसूण, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा त्यात थोडे मीठ घालून शेवग्याच्या शेंगा घाला.
शेवग्याच्या शेंगा उकळवून झाल्या की, कढईत बेसन भाजून घ्या.
गॅसवर एका भांड्यात गरम तेलामध्ये मोहरी, हिंग, लाल मिरची, हळद याची फोडणी द्या.फोडणीमध्ये शेवग्याच्या शेंगा घालून परतून घ्या.
भाजलेल्या बेसनामध्ये पाणी त्याची पातळ पेस्ट करा नंतर हे संपूर्ण मिश्रण तयार फोडणीमध्ये घालून चांगले ढवळून घ्या.
अशाप्रकारे गावरान स्टाईल शेवग्यांच्या शेंगांचं पिठलं तयार आहे.