Shruti Vilas Kadam
शेपूमध्ये भरपूर फायबर असल्याने अन्न पचण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या कमी होऊ शकते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन K यांसारखी पोषक तत्त्वे हाडांची मजबुती टिकवून ठेवण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
शेपूतील फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मधुमेहींसाठीही ही भाजी उपयुक्त ठरू शकते.
पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे अतिरिक्त खाणे टाळले जाऊ शकते.
शेपूतील जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास तसेच केस मजबूत आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.