Shruti Vilas Kadam
चिन्मयी साळवीने गुलाबी रंगाच्या आकर्षक साडीत फोटोशूट केले असून तिचा सोज्वळ आणि एलिगंट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या फोटोशूटमध्ये तिने जुन्या काळातील रेट्रो फॅशनचा अंदाज स्वीकारला आहे. पारंपरिक पोशाख आणि स्टायलिंगमुळे तिचा लूक अधिक उठून दिसत आहे.
हलकासा मेकअप, उठावदार डोळ्यांचा मेकअप आणि नैसर्गिक लूकमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
साडीसोबत निवडलेले पारंपरिक दागिने आणि आकर्षक अॅक्सेसरीजमुळे तिच्या संपूर्ण लूकला रॉयल टच मिळाला आहे.
चिन्मयीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी लाइक्स आणि कौतुकाच्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
झी मराठीवरील 'सनई चौघडे' मालिकेत 'शर्वरी'ची भूमिका साकारून चिन्मयी साळवीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
अभिनयाबरोबरच चिन्मयी तिच्या पारंपरिक आणि आधुनिक फॅशन स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. तिचे प्रत्येक फोटोशूट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते.