ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शहनाज गिल हि अभिनेत्री असून ती बिग बॅास १३ सिजनचा एक भाग होती.
सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल या दोघांची बिग बॅास मधील केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती.
तसेच आता बिग बॉस १९ सीजन चालू झाला असून, यात अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत.
शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा याने अखेर वाइल्डकार्ड कंटेस्टेंट म्हणून बिग बॅास १९ च्या घरात एंट्री केली आहे.
शहबाज बदेशाने घरात एंट्री करताच सगळयांशी मैत्री केली आहे.
तसेच पुन्हा एकदा, शाहबाज बदेशा त्याच्या टॅटूमुळे चर्चेत आला असून, बिग बॉस १९ च्या स्पर्धकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जेव्हा आवाज दरबारने त्याला त्याच्या हातावरील टॅटूबद्दल विचारले तेव्हा बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शाहबाज बदेशा भावुक झाला.
"टॅटूबद्दल बोलताना शाहबाज बदेशा म्हणाला, 'हा टॅटू मी सिद्धार्थ शुक्लाच्या चेहऱ्याचा काढला आहे. तो माझ्यासाठी फक्त भाऊ नव्हता, तर एक प्रेरणा होता. त्याच्या निधनानंतर त्याची आठवण म्हणून मी हा टॅटू हातावर गोंदवून घेतला.' त्यांचे हे बोलणे ऐकून घरातील सर्वजण भावूक झाले."