Siddhi Hande
कचोरी बनवण्यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये मैदा घ्या. त्यात मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घ्या.
यानंतर पीठात थोडं तेल टाका. जेवढं तेल तेवढेच पाणी टाका.
त्यानंतर पीठाचा छान गोळा बनवून घ्या.त्यानंतर १५-२० मिनिटे बाजूला झाकून ठेवा.
यानंतर कचोरीचे सारण बनवण्यासाठी धने, जिरे, बडीशेप छान भाजून घ्या. हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची जाडसर पूड बनवून घ्या.
त्यानंतर ही पूड काढून ठेवा. त्यानंतर त्याच भांड्यात हिरवी मिरची, लसूण, आलं टाका. याची चांगली पेस्ट बनवून घ्या.
त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाका. त्यात जिरं मोहरी टाका. त्यानंतर ही मिरचीची पेस्ट टाका.
हे परतून झाल्यानंतर त्यात तयार केलेला मसाला, लाल तिखट, गरम मसाला टाका.
त्यानंतर मसाल्यात थोडं बेसन टाका. बेसन भाजलं की त्यावर थोडं पाणी टाका. २-३ मिनिटं छान शिजवून घ्या.
यानंतर मैदाच्या पीठाचे गोळे बनवून घ्या. त्याची पुरी बनवा. त्यात कचोरीचे स्टफिंग टाका.
त्यानंतर वरच्या बाजूने अजून एक पुरी लावून घ्या. त्यानंतर मंद आचेवर कचोरी तळून घ्या.